आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत घटकपक्षांना नेमक्या कोणत्या १८ जागा द्यायच्या याविषयी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याशी झालेल्या बैठकीचा तपशील चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच भाजप शिवेसेनेच्या बैठकीत काही जागांच्या अदलाबदलीविषषी चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
अंतिम फॉर्म्युला ठरविण्यासाठी या बैठकीला महत्व प्राप्त झालंय. चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या असून अजुन काही फेऱ्या होणार आहेत. झालेल्या चर्चेचा तपशील दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या ज्येष्ठ नेत्यांना देत आहेत.
दरम्यान उद्या भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कोणतीही बैठक नसेल. भाजप सेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्यावरच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel